Home महाराष्ट्र उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी

2
Students who have passed the Higher Secondary Certificate (12th) examination

पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले आहे.

विद्यार्थ्यांनी आपली आवड आणि कल विचारात घेऊन पुढील वाटचाल करावी, या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी हताश न होता पुन्हा नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे व यश संपादन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये आयोजित उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एचएससी) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

बारावी मध्ये उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.७९ आहे. सर्व विभागीय मंडळांमधून कोकण विभागाचा निकाल ९४.१४ टक्के इतका सर्वाधिक आहे.

सर्व विभागीय मंडळांतून नियमित मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८६.८० टक्के असून मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.१५ टक्के असून मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ६.३५ टक्क्यांनी जास्त आहे.

#HSCResult

#HSCResult2026

#MaharashtraBoard