असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू) च्या १०० व्या वार्षिक महासभेचे व ‘ज्ञान आणि नवोपक्रमातून स्वावलंबी भारत घडवणे’
विषयावर राष्ट्रीय कुलगुरू परिषदेचे उद्घाटन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.देशाला २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी नवोपक्रम, संशोधन आणि सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था अत्यावश्यक असून या माध्यमातून विकासाचे लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी यावेळी केले. विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, नवोपक्रम आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्याची गरज […]
विषयावर राष्ट्रीय कुलगुरू परिषदेचे उद्घाटन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.देशाला २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी नवोपक्रम, संशोधन आणि सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था अत्यावश्यक असून या माध्यमातून विकासाचे लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी यावेळी केले.
विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, नवोपक्रम आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्याची गरज आहे. विद्यापीठांना राष्ट्रीय व जागतिक स्तरावर प्रगती करताना दुर्बल घटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी प्रयत्न वाढवावेत. उच्च शिक्षण संस्थांनी नोकरी शोधणारे नव्हे, तर नोकरी निर्माण करणारे युवक घडवावेत. कौशल्य विकासाला प्राधान्य देत सर्वसमावेशक शिक्षण पद्धती उभारण्याचे आवाहनही राज्यपालांनी केले.
Follow Us:

