ज्युनियर कलाकारांच्या न्याय्य मागण्यांवर शासन सकारात्मक – मंत्री आकाश फुंडकर

मुंबई: राज्यातील ज्युनियर कलाकारांच्या वेतनवाढ, सेवा अटी तसेच कामगार हक्कांबाबत शासन संवेदनशील असून त्यांच्या सर्व न्याय्य मागण्यांवर नियमानुसार आणि कायदेशीर चौकटीत योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली. ज्युनियर आर्टिस्ट असोसिएशनच्या प्रतिनिधींनी मंत्री फुंडकर यांची भेट घेऊन विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी प्रतिनिधींच्या मागण्या सविस्तरपणे ऐकून घेत […]
ज्युनियर कलाकारांच्या न्याय्य मागण्यांवर शासन सकारात्मक – मंत्री आकाश फुंडकर
Government positive regarding the legitimate demands of junior artists – Minister Akash Fundkar

मुंबई: राज्यातील ज्युनियर कलाकारांच्या वेतनवाढ, सेवा अटी तसेच कामगार हक्कांबाबत शासन संवेदनशील असून त्यांच्या सर्व न्याय्य मागण्यांवर नियमानुसार आणि कायदेशीर चौकटीत योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली.

ज्युनियर आर्टिस्ट असोसिएशनच्या प्रतिनिधींनी मंत्री फुंडकर यांची भेट घेऊन विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी प्रतिनिधींच्या मागण्या सविस्तरपणे ऐकून घेत संबंधित विषयाची गांभीर्याने दखल घेतली.

यावेळी मंत्री फुंडकर म्हणाले, मनोरंजन क्षेत्रातील कनिष्ठ कलाकार हे या उद्योगाचा महत्त्वाचा घटक असून त्यांच्या श्रमांचा योग्य सन्मान होणे आवश्यक आहे. कामगारांचे हित, सुरक्षितता आणि न्याय्य वेतन ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून संबंधित सर्व बाबींची सखोल पडताळणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. कामगारांचे हक्क अबाधित राहतील, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

कामगार विभागाच्या माध्यमातून संबंधित यंत्रणा, ज्युनियर आर्टिस्ट असोसिएशन आणि निर्माते संघटना यांच्यात समन्वय साधून सर्वमान्य व शाश्वत तोडगा काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. कामगारांच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करून कायदेशीर तरतुदींनुसार निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील प्रत्येक कामगाराला सन्मानाने आणि सुरक्षित वातावरणात काम करण्याची संधी मिळावी, ही शासनाची भूमिका असून कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असेही मंत्री फुंडकर यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: