कलेच्या हाताला,मदतीचा हात आमदार किरण सामंत यांनी घेतली रायपाटनच्या कु.श्वेता इस्कार हीच्या कलाशिक्षणाची जबाबदारी
राजापूर:-तालुक्यातील रायपाटण गावची सुकन्या कु.श्वेता चंद्रशेखर इस्कार हिच्या घरात कलेचा वारसा नसताना व कलाक्षेत्रातील कोणतंही शिक्षण न घेता.
अंगी असलेल्या कलागुणामूळे व जिद्द, चिकाटी, आवड व सातत्य सरावामुळे आज वर तिने अनेक चित्र रेखाटली व रांगोळ्या काढल्या. तसेच देवरुख, कुडाळ, सावंतवाडी,देवगड येथे मोठ मोठ्या रांगोळी स्पर्धेत सहभागी होऊन पारितोषिके मिळाली. परंतू आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कलाक्षेत्रातील शिक्षणापासून वंचित राहिली.या सर्वांची माहिती आमदार महोदयांना कळताच तिच्या शिक्षणासाठी लागणारी सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या वतीने तालूकाप्रमुख दिपक नागले तीच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट व परिस्थिती जाणून घेऊन कला क्षेत्रातील नागपूर येथे हायपर रिअलास्टिक पोर्ट्रीट आणि संस्कार भारती रांगोळी शिक्षणासाठी लागणारा सर्व खर्चाची मदत केली व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपविभागप्रमुख प्रल्हाद नारकर, विनायक निखांर्गे, विनोद शेलार व ग्रामस्थ उपस्थित होते.
Follow Us:

