‘प्रकाशचित्रांतून लोककलावंतांचे स्मृतीवंदन’ पुस्तकाचे ९ सप्टेंबरला प्रकाशन; विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

डॉ. नितीन सोनवणे लिखित ‘प्रकाशचित्रांतून लोककलावंतांचे स्मृतीवंदन’ या पुस्तकाचे प्रकाशन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांनी केले आहे.
‘प्रकाशचित्रांतून लोककलावंतांचे स्मृतीवंदन’ पुस्तकाचे ९ सप्टेंबरला प्रकाशन; विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
prakashchitranatun-lokkalavantanche-smrutivandan-pustakache-9-saptembarla-prakashan-vishesh-sanskritik-karyakram

बुधवार, ९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता प्रभादेवी, मुंबई येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या करिष्मा सभागृह, ५ वा मजला येथे हा कार्यक्रम होईल. प्रकाशन सोहळ्यानंतर शेखर निरंजन भाकरे आणि सहकलाकारांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून कलारसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250