
संमेलनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दरमहा प्रकाशित करण्यात येत असलेल्या व महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार असलेल्या लोकराज्य मासिकासह विविध विभागांची एकूण ३३ विषयांवरील दालने नागरिकांना माहिती देण्यासाठी सज्ज झाली आहेत.
या दालनांच्या माध्यमातून राज्याचा इतिहास, भाषा, संस्कृती, साहित्य, विज्ञान, कृषी, सामाजिक विकास, कौशल्यविकास आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. सर्व नागरिक, लेखक, कवी, साहित्यप्रेमी, संशोधक, विद्यार्थी व पर्यटकांनी या दालनांना अवश्य भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.















