Home महाराष्ट्र विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची ८९ वी बैठक मंत्रालयात जलसंपदा मंत्री...

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची ८९ वी बैठक मंत्रालयात जलसंपदा मंत्री तथा नियामक मंडळाचे अध्यक्ष गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

0
The 89th meeting of the Governing Board of the Vidarbha Irrigation Development Corporation was held at the Ministry under the chairmanship of Girish Mahajan, Minister for Water Resources and Chairman of the Governing Board.

बैठकीत विविध प्रकल्पांच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. या मंजूर कामांमुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नावर तोडगा निघणार असून सिंचन प्रकल्पांच्या प्रगतीला गती मिळणार असल्याचे जलसंपदा मंत्री महाजन यांनी सांगितले.

जलसंपदा मंत्री महाजन यांनी प्रकल्पांची कामे करताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करण्याचे निर्देश दिली. “सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याची हमी मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे कामे वेळेत व दर्जेदार पूर्ण व्हावीत,” असे त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीस अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांच्यासह नियामक मंडळाचे सदस्य व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.