Home पर्यटन कन्हेरी येथील पर्यटन उद्यानाचे ‘स्व. मा. अजितदादा पवार पर्यटन उद्यान

कन्हेरी येथील पर्यटन उद्यानाचे ‘स्व. मा. अजितदादा पवार पर्यटन उद्यान

1
The 'Late Hon. Ajitdada Pawar Tourism Park' at Kanheri.

बारामती’ आणि ‘देवगिरी ते देवराई’ या नामफलकांचे अनावरण करून राज्यव्यापी वृक्षसंवर्धन अभियानाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला.राज्य शासनाने सन २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठरविले असून, यावर्षी सुरुवातीच्या टप्प्यात १८ कोटी वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन आहे. वृक्षलागवड ही लोकचळवळ बनविण्यासाठी शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, औद्योगिक कंपन्या आदींनी या मोहिमेत राज्य शासनासोबत सहभागी होऊन योगदान द्यावे, असे आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

पर्यावरणरक्षण ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. शासन, उद्योग, सामाजिक संस्था आणि जनसहभाग यांच्या योग्य समन्वयातून व एकत्रित प्रयत्नांतूनच हरित, समृद्ध आणि शाश्वत महाराष्ट्राचे स्वप्न साकार होईल. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली पर्यावरण संवर्धनाची ही प्रेरणा एका व्यापक चळवळीत रूपांतरित करूया आणि आपल्या महाराष्ट्राला सुजलाम्-सुफलाम् बनवूया, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी वनसंरक्षक आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, सहाय्यक वनसंरक्षक अतुल जैनक, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे, नगराध्यक्ष सचिन सातव, अभिनेता तथा सह्याद्री देवराई फाऊंडेशनचे सयाजी शिंदे, लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.