Home शैक्षणिक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.४ थी) व उच्च प्राथमिक...

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.७ वी) २६ एप्रिल, २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आली आहे.

0
The Primary Scholarship Examination (E.4th) and Upper Primary Scholarship Examination (E.7th) have been organized on a single day on April 26, 2026 in all districts of the state of Maharashtra by the Maharashtra State Examination Council.

विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता नियमित शुल्कासह ६ मार्च, २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. विलंब शुल्कासह ८ मार्च आणि अतिविलंब शुल्कासह १० मार्च पर्यंत ही मुदत असेल, असे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार बेडसे यांनी कळविले आहे.

परीक्षेकरिता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दिलेल्या मुदतीत सदर प्रक्रिया पूर्ण करावी. १० मार्च २०२६ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाहीत याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.