Home महाराष्ट्र पल्स या वैद्यकीय परिषदेचे आयोजन मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर, येथे २७ व...

पल्स या वैद्यकीय परिषदेचे आयोजन मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर, येथे २७ व २८ मार्च २०२६ रोजी करण्यात येणार आहे.

0
The Pulse medical conference will be held at the Jio World Center in Mumbai on March 27th and 28th, 2026.

पल्स २०२६ च्या ‘कर्टन रेझर’ कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधानभवन येथे पार पडला. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.

सध्या जगामध्ये प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाची प्रगती होत आहे. आरोग्य क्षेत्रातही दररोज नवनवे तंत्रज्ञान येत आहे. नवनवीन संशोधन, येणारे तंत्रज्ञान, दुर्धर आजारावरील परवडणारे उपचार आणि आजारांना प्रतिबंध या सर्वांचा संगम मुंबईत आयोजित ‘पल्स’ परिषदेत होणार आहे. त्यामुळे निश्चितच आरोग्य क्षेत्रात जगात महाराष्ट्राचा लौकिक वाढणार आहे, असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

मानवी आरोग्यासाठी निर्माण होणाऱ्या नवनवीन आव्हानांवर यशस्वी मात करण्यासाठी राज्य शासन कार्यरत आहे. सध्या शासन, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राने सोबत येऊन यावर उपाय काढण्याची आवश्यकता असून खासगी क्षेत्राने संशोधनातून अशा समस्यांवर उपाय काढावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

कृत्रिमबुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे संपूर्ण आरोग्य क्षेत्राचा कायापालट होत आहे. या तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस आरोग्य क्षेत्रात बदल होत आहेत. परिषदेच्या यशस्वी आयोजनानंतर पुढील प्रत्येक वर्षी परिषद आयोजित व्हावी. या परिषदेच्या आयोजनातून आरोग्य यंत्रणेला निश्चितच बळकट करण्याचे कार्य होईल, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.