राज्यातील बालकांना पोलिओसारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळावे तसेच गोवर-रुबेला निर्मूलन आणि एचपीव्ही लसीकरण मोहिमेला गती मिळावी
सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश राज्य लसीकरण कृती दलाच्या बैठकीत देण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. २८ जून २०२६ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण दिनाच्या तयारीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. राज्यात ० ते ५ वर्षे वयोगटातील अंदाजे १ कोटी २ लाख ९१ […]
सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश राज्य लसीकरण कृती दलाच्या बैठकीत देण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
२८ जून २०२६ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण दिनाच्या तयारीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. राज्यात ० ते ५ वर्षे वयोगटातील अंदाजे १ कोटी २ लाख ९१ हजार ८१६ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरात ८९ हजार ४८९ लसीकरण बूथ, २ लाख ७६ हजार १६१ घरभेट पथक दिवस, २६ हजार ५३० संक्रमण पथक दिवस, १३ हजार ५१८ मोबाईल पथक दिवस आणि ५८६ रात्रीची विशेष पथके कार्यरत राहणार आहेत.
Follow Us:

