
https://forms.gle/ix76WxCTeTtZFH6R8 ही अर्जाची लिंक असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ एप्रिल, २०२६ आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी कळविले आहे.
या उपक्रमांतर्गत मुंबई शहराकरिता पाच क्रीडा प्रकारांची क्रीडा प्रतिभा विकास केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. बॅडमिंटन, बॉक्सिंग, शूटींग, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारांसाठी जिल्हास्तरावर निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे. निवड प्रक्रियेदरम्यान तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत खेळाडूंचे कौशल्य परीक्षण करण्यात येणार असून निवड झालेल्या खेळाडूंना प्रगत प्रशिक्षण व करिअर मार्गदर्शन दिले जाणार आहे.
या निवड चाचण्यांसाठी २१ वर्षांखालील खेळाडू पात्र असून जिल्हास्तरावर पदकप्राप्त, विभागस्तर, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतला असणे अनिवार्य आहे. निवड चाचणी संदर्भात अधिक माहितीसाठी निलेश गराटे – 9702212925, साहिल उतेकर – 9702171004, समृद्धी देवळेकर – 8779727571 यावर संपर्क साधावा.















