
परिषदेच्या सदस्यांनी राज्यपालांना यमगरवाडी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथील एकलव्य विद्या संकुल येथे भेट देण्याचे निमंत्रण दिले. तसेच दिनांक ३१ ऑगस्ट या विमुक्त दिनानिमित्त जातीचा दाखला, आधार कार्ड आदी कागदपत्रे वितरणाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.
यावेळी भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ संजय पुरी, कार्यवाह नरसिंग झरे, कोषाध्यक्ष नरेश पोटे, विदर्भ संयोजक राजेंद्र दोनाडकर, प्रांत सहसंयोजक शरद मखर व राहुल चव्हाण आदी उपस्थित होते.















