Home सरकारी योजना ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे हे महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील भीष्म पितामह...

ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे हे महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील भीष्म पितामह असून, धडधाकट शरीरयष्टी, कणखर आवाज, शिस्त आणि दरारा हे त्यांचे गुण वाखाणण्यासारखे आहेत

1
Veteran leader Annasaheb Dange is a towering figure—a patriarch—in the social and political spheres of Maharashtra; his robust physique, commanding voice, discipline, and imposing presence are truly admirable.

तळागाळातील जनतेचे प्रश्न प्रशासकीय पकड व सखोल अभ्यास याद्वारे त्यांनी सोडवले असून, महाराष्ट्राला टँकरच्या जाळ्यातून मुक्त करण्याचे श्रेय अण्णासाहेब डांगे यांना जाते, असे कौतुकोद्‌गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वाळवा तालुक्यातील आष्टा येथे माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे यांचे अभिष्टचिंतन, ‘आम्रवृक्ष’ आत्मचरित्राचे प्रकाशन आणि आष्टा शैक्षणिक संकुलातील शैक्षणिक इमारतींचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, सत्कारमूर्ती डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते सुभद्रा इंटरनॅशनल स्कूल व अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ फार्मसी इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. तसेच अण्णासाहेब डांगे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यात शैक्षणिक संकुलातील विविध नूतन वास्तूंचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीला अधिक बळ देणाऱ्या या सुविधांमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार आहे