Home नंदुरबार जिल्हा आदिवासी संस्कृतीचा जागर;शताब्दी महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिवस उत्साहात

आदिवासी संस्कृतीचा जागर;शताब्दी महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिवस उत्साहात

1
Celebrating Tribal Culture: World Tribal Day Observed with Enthusiasm at Shatabdi College

नंदुरबार(प्रतिनिधी):-आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या गौरवशाली परंपरा, कला, संस्कृती आणि नैसर्गिक जीवनशैलीचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आले. विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृती व परंपरांवर आधारित विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण, शैक्षणिक व सामाजिक विकास तसेच त्यांच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना आदिवासी समाजाच्या इतिहासाची व योगदानाची माहिती देत सामाजिक समतेचा आणि विविधतेचा आदर करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक जाणीव आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती योगिता गणेश पाटील व सचिव गणेश गोविंद पाटील यांनी आयोजक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.