देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

नंदुरबार(प्रतिनिधी):-आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण, संस्कृतीचे संवर्धन आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी 9 ऑगस्ट हा दिवस साजरा करण्यात येत आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांनी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केले व विविध आदिवासी नायकांनी आपल्या बांधवांच्या हक्कासाठी व देशाला स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेणाऱ्या विविध […]
देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन
Various programs organized at Devare Vidyalaya to mark World Tribal Day.

नंदुरबार(प्रतिनिधी):-आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण, संस्कृतीचे संवर्धन आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी 9 ऑगस्ट हा दिवस साजरा करण्यात येत आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांनी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केले व विविध आदिवासी नायकांनी आपल्या बांधवांच्या हक्कासाठी व देशाला स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेणाऱ्या विविध विरांचे जीवनचरित्र आपल्या मनोगतातून मांडले. विद्यालयाचे उपशिक्षक सी. व्ही.नांद्रे यांनी विश्व आदिवासी गौरव दिनाचे महत्त्व व उद्देश आदिवासी समाजाची परंपरा, भाषा, कला, संस्कृती, रूढी आणि निसर्गाशी असलेले नाते यांचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे आपल्या मनोगतात व्यक्त केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या परंपरेला, संस्कृतीला साजेशी वेशभूषा करून सिबली, धनुष्यबाण,ध्वज पताका व आदिवासी बांधवांचा पारंपारिक पेहराव करून विखरण गावातून रॅलीद्वारे नृत्याचा ठेका धरत विविध घोष वाक्यांच्या गजरात मिरवणूक काढली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. बी.भारती, वाय.डी.बागुल यांनी तर आभार एम.डी.नेरकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस.जी.पाटील व एच. एम. खैरनार यांनी संयोजन केले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: