
रोहा येथील ब्लड बँक तातडीने नागरिकांच्या सुविधेसाठी खुली करावी. श्रीवर्धन व म्हसळा येथे डम्पिंग ग्राउंडच्या उभारणीच्या कार्यवाहीस गती देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. नागरिकांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रलंबित कामांना गती देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी ब्लड बँकेचे काम जवळपास पूर्ण झाले असून आवश्यक यंत्रसामग्री व इतर बाबींची पूर्तता करून ती लवकरच नागरिकांसाठी सुरू करण्याबाबत माहिती दिली.















