Home महाराष्ट्र लोकप्रतिनिधींचे जनतेप्रति उत्तरदायित्व ही केवळ नैतिक अपेक्षा नसून

लोकप्रतिनिधींचे जनतेप्रति उत्तरदायित्व ही केवळ नैतिक अपेक्षा नसून

7
The accountability of public representatives to the public is not just a moral expectation, but

सशक्त आणि गतिमान लोकशाहीसाठीची एक अनिवार्य कार्यात्मक गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.लखनौ येथे ८६व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे (एआयपीओसी) आयोजन करण्यात आले.परिषदेत ‘जनतेप्रति विधिमंडळांचे उत्तरदायित्व’ या विषयावर विचार मांडताना सभापती प्रा. शिंदे म्हणाले की, लोकप्रतिनिधी आणि लोकशाही संस्थांची अधिमान्यता केवळ निवडणुकीद्वारे मिळत नाही, तर सातत्यपूर्ण पारदर्शकता, नैतिक आचरण आणि जनतेच्या आकांक्षांप्रति संवेदनशीलतेतून ती दृढ होत जाते.लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे उपसभापती तसेच देशभरातील पीठासीन अधिकारी उपस्थित असलेल्या या गौरवशाली संमेलनास त्यांनी ‘अमृत काळा’तील सामूहिक आत्मपरीक्षणाचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ असे संबोधले.