प्रकाशा येथील सिमेंट कारखान्यास मा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांची भेट स्थानिक विकास, पर्यावरण संरक्षण व रोजगारनिर्मितीवर भर

प्रकाशा (ता. शहादा) येथील सिमेंट कारखान्यास मा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान सिमेंट कारखाना उभारणी कामी स्थानिक नागरिकांच्या अडी-अडचणी ऐकून घेण्यात आल्या तसेच कारखान्याच्या कार्यपद्धतीचा आढावा घेऊन पर्यावरणीय बाबी, वाहतूक व्यवस्थापन तसेच स्थानिक नागरिकांच्या हिताशी संबंधित महत्त्वाच्या सूचनांवर भर देण्यात आला. भेटीदरम्यान सूचित करण्यात आलेले महत्त्वाचे मुद्दे: 1. सिमेंट उत्पादन […]
प्रकाशा येथील सिमेंट कारखान्यास मा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांची भेट स्थानिक विकास, पर्यावरण संरक्षण व रोजगारनिर्मितीवर भर
Visit of Hon'ble Sub-Divisional Officer Shri. Krishnakant Kanwariya to Cement Factory in Prakasha, emphasis on local development, environmental protection and employment generation

प्रकाशा (ता. शहादा) येथील सिमेंट कारखान्यास मा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान सिमेंट कारखाना उभारणी कामी स्थानिक नागरिकांच्या अडी-अडचणी ऐकून घेण्यात आल्या तसेच कारखान्याच्या कार्यपद्धतीचा आढावा घेऊन पर्यावरणीय बाबी, वाहतूक व्यवस्थापन तसेच स्थानिक नागरिकांच्या हिताशी संबंधित महत्त्वाच्या सूचनांवर भर देण्यात आला.

भेटीदरम्यान सूचित करण्यात आलेले महत्त्वाचे मुद्दे:

1. सिमेंट उत्पादन प्रक्रियेदरम्यान निर्माण होणारी धूळ (Dust) कारखान्याच्या परिसरात तसेच लगतच्या शेतजमिनीवर पडणार नाही, यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

2. सिमेंट व कच्चा माल वाहतुकीचे नियोजन प्रामुख्याने रात्रीच्या वेळेत करावे, जेणेकरून दिवसा मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही.

3. कारखान्यामुळे स्थानिक नागरिकांसाठी रोजगारनिर्मिती होणे अपेक्षित असून, त्यासाठी स्थानिक युवकांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले.

4. उद्योग सुरू झाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे नमूद करण्यात आले.

5. मुख्य रस्त्यापासून कारखान्यापर्यंत दर्जेदार व सुरक्षित रस्ता विकसित करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.

6. ग्रामपंचायतीसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी CSR फंडाचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांच्या या भेटीमुळे औद्योगिक विकासासोबतच पर्यावरण संरक्षण, स्थानिक रोजगार, वाहतूक शिस्त व ग्रामविकास या बाबींना समान महत्त्व देण्याचा प्रशासनाचा दृष्टिकोन स्पष्ट झाला आहे. औद्योगिक प्रगती ही स्थानिक नागरिकांच्या हिताशी सुसंगत असावी, या उद्देशाने प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार आहे.

(Collector Office Nandurbar)

#IndustrialDevelopment#LocalEmployment#EnvironmentalSafety

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: