नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच पाणी मिळेल
नंदुरबार:-जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयात मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्ह्यात अनेक वर्ष पासून रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी बैठक घेण्यात आली अगोदर धुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाची बैठक नंतर तापी बुराई आणि आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील प्रकल्पासंदर्भात बैठक घेण्यात आली
या बैठकीस आमदार आमशा पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले, प्रधान सचिव, सचिव कार्यकारी संचालक तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग जळगाव, अधीक्षक अभियंता धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळ धुळे, तसेच सर्व संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित होते, या बैठकीत नंदुरबार जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्प आणि नऊ लघु प्रकल्प झालेले सिंचन प्रकल्प या प्रकल्पातून शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली बैठकीत शेतकऱ्यांसाठी सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून लवकरात लवकर शेतकऱ्यांना पाणी मिळेल असा निर्णय मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून घेण्यात आला, या बैठकीस के टी गावित, अरुण गावित, देवमन पवार, सरपंच राजेश वसावे, आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.
Follow Us:

