Home महाराष्ट्र मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी शनिवारी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण कार्यालयाचा सविस्तर आढावा घेतला.

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी शनिवारी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण कार्यालयाचा सविस्तर आढावा घेतला.

0
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी शनिवारी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण कार्यालयाचा सविस्तर आढावा घेतला.
Chief Secretary Rajesh Agarwal conducted a detailed review of the Inspector General of Registration and Stamp Control Office on Saturday.

कार्यालयाच्या प्रशासकीय, तांत्रिक तसेच नागरिक सेवाविषयक विविध बाबींची माहिती त्यांनी घेतली.

या आढावा बैठकीदरम्यान नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, दस्तऐवज नोंदणीची प्रक्रिया, संगणकीकरण, ऑनलाईन सुविधा तसेच तक्रार निवारण यंत्रणा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व कालबद्ध करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा राबविण्याच्या दृष्टीने मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

यानंतर मुख्य सचिवांनी नव्या प्रशासकीय इमारतीच्या शेजारी उभारण्यात येत असलेल्या नोंदणी भवनाची पाहणी केली. या इमारतीच्या बांधकामाची सद्यस्थिती, उपलब्ध होणाऱ्या सुविधा, कार्यालयीन जागेचे नियोजन, नागरिकांसाठी प्रतीक्षालय, पार्किंग व्यवस्था तसेच आधुनिक पायाभूत सुविधांबाबत त्यांनी माहिती घेतली. बांधकामाचे काम नियोजित कालमर्यादेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या आढावा बैठकीस जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे, सह नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक राजेंद्र मुठे यांच्यासह नोंदणी व मुद्रांक नियंत्रण कार्यालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान विभागाच्या कामकाजातील अडचणी, भविष्यातील गरजा तसेच सुधारणा योजनांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here