१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत कार्यालयाची वेबसाइट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सऍप चॅटबॉट, AI व Blockchain चा शासकीय कामकाजात वापर आणि GIS चा कामात वापर अशा ७ सर्वंकष मुद्यांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शासकीय कार्यालयांची निवड दि. २६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आली.
निवडणूक आचारसंहितेमुळे प्रलंबित ठेवलेला जिल्हा परिषद कार्यालये संवर्गाचा निकाल आज जाहीर होत आहे.
१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुणे, सांगली, ठाणे, नागपूर व नाशिक जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या चमूंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हार्दिक अभिनंदन केले!
सर्व विजेत्यांचा लवकरच राज्य शासनातर्फे गौरव करण्यात येईल.
















