Home नोकरी-करिअर तुळसवडे गावासाठी अभिमानास्पद बाब, पळसमकर वाडीचा सुपुत्र हितेश पळसमकर मंत्रालयात महसूल सहाय्यकपदी...

तुळसवडे गावासाठी अभिमानास्पद बाब, पळसमकर वाडीचा सुपुत्र हितेश पळसमकर मंत्रालयात महसूल सहाय्यकपदी रुजू

0
A proud moment for Tulsavade village: Hitesh Palsamkar, a son of Palsamkar Wadi, has joined the Mantralaya as a Revenue Assistant.

राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील तुळसवडे गावच्या फळसमकर वाडीचा सुपुत्र हितेश फळसमकऱ आणि सदाशिव शांताराम फळसमकर यांचा मुलगा. मंत्रालयात महसूल सहाय्यक म्हणून रुजू झाला. ही गोष्ट खरंच आपल्या सगळ्या गावासाठी अभिमानाची आहे.कोरोनाच्या काळात दोन-तीन वेळा गावाकडे हितेशची भेट झाली होती. तेव्हाच तो म्हणायचा, “दादा, MPSC करतोय… सरकारी नोकरी मिळवायचीच त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास होता आणि डोळ्यांत मोठं स्वप्न होतं. बी.कॉम. झाल्यावर दोन वर्षं प्रायव्हेट नोकरी केली, पण मन मात्र अभ्यासातच होतं. दिवसभर काम आणि उरलेला वेळ पुस्तकांमध्ये असा त्याचा संघर्ष सुरू होता. एक दोन वेळा रेल्वेने मुंबईला येताना त्याची पुस्तकांची साथ देखील पाहिली होती. आज त्याच सार्थक झालं. MPSC परीक्षा पास होणे ही काही साधीसुधी गोष्ट नाही. कित्येक जण वर्षानुवर्षं अभ्यास करतात, अपयश येतं, खचून जातात. पण हितेशनं हार मानली नाही. परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द सोडली नाही. आज त्या कष्टाचं चीज झालं. शेतकऱ्यांचा मुलगा मंत्रालयात पोहोचला महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC-2025) घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत विक्रीकर सहाय्यक आणि महसूल सहाय्यक या दोन्ही पदांसाठी उल्लेखनीय यश संपादन केले आहे हे खरंच कौतुकास्पद आहे. आज मंत्रालयात त्याची भेट झाली त्याचं अभिनंदन केलं, तेव्हा खरंच मन भरून आलं. आपल्या गावातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाने स्वतःच्या जिद्दीच्या आणि कष्टाच्या बळावर हे यश मिळवले ही बाब संपूर्ण तुळसवडे गावासाठी अभिमानाची आहे. त्याचा हा संघर्ष, अविरत मेहनत, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी घेतलेली अविरत मेहनत, प्रचंड जिद्द आणि यशाला घातलेली गवसणी निश्चितच गावातील विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल असा विश्वास माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांचे‌ स्वीय सहाय्यक आदिनाथ कपाळे यांनी व्यक्त केला आहे.