यावल(प्रतिनिधी):-आदिवासी विकास कार्यालय यावल अंतर्गत- प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 18 जुलै 2026 रोजी शासकीय आश्रम शाळा पिंगळवाडे ता. अमळनेर येथे रानभाज्या महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवात विविध पालेभाज्यांचे आणल्या होत्या या पालेभाज्यापासून आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात याबाबत मुला मुलींना माहिती देण्यात आली. या महोत्सवात सर्व शिक्षक, अधीक्षक, अधीक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, सावित्रीबाई फुले महिला मंडळ संस्थचे- आश्रम शाळा संघटक मनीषा बैसाणे. उपस्थित होते.
















