
छत्रपती संभाजीनगर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास अप्पर विभागीय आयुक्त प्रताप काळे, अपर आयुक्त महसूल रीता मेत्रेवार, अपर आयुक्त आस्थापना दादासाहेब वानखेडे सह आयुक्त रोहयो डॉ. अनंत गव्हाणे, तहसिलदार किशन भदाने आदींसह विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. त्यांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.















