
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज धडगाव येथील ग्रामीण रुग्णालय व महिला रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची सविस्तर पाहणी केली. आरोग्य सेवा अधिक सक्षम, दर्जेदार व नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने त्यांनी विविध बाबींचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
भेटीदरम्यान त्यांनी SNCU (Special Newborn Care Unit) विभागाला भेट देऊन मंजूर पदे, कार्यरत मनुष्यबळ, उपलब्ध वैद्यकीय उपकरणे, आवश्यक अतिरिक्त मनुष्यबळ तसेच भविष्यात लागणाऱ्या साहित्याची माहिती घेतली.
रुग्णालयातील वीज पुरवठा, व्होल्टेजची स्थिती आणि अखंडित वीज उपलब्धतेबाबत माहिती घेऊन आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्याबाबत सूचना करण्यात आल्या.
KMC (Kangaroo Mother Care) विभागासाठी उपलब्ध जागेची पाहणी करून त्या ठिकाणी आवश्यक सुविधा विकसित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यानंतर रुग्णालयातील पॅन्ट्रीची पाहणी करून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात आली. यावेळी मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी स्वतः जेवणाची चव घेऊन त्याच्या गुणवत्तेची खात्री केली. तसेच आहारातील स्वच्छता, पौष्टिकता आणि गुणवत्ता कायम राखण्यासाठी संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.
आरोग्य सेवांचा दर्जा उंचावून प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण व सुरक्षित आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन सातत्याने कार्यरत आहे.
#Nandurbar#NandurbarDistrict#CollectorNandurbar#डॉ_मित्ताली_सेठी#Dhadgaon#RuralHospital#WomenHospital#Healthcare#SNCU#KMC#PublicHealth#Maharashtra#DistrictAdministration#HealthForAll#नंदुरबार#जिल्हाधिकारी#आरोग्यसेवा#धडगाव#जनकल्याण















