नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी भारतीय जनगणनेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे. 01 मे 2026 पासून मोबाईल ॲपच्या माध्यमातून स्व-गणनेचा पहिला टप्पा सुरू झाला असून, नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी स्वतः महाराष्ट्र दिनाच्या ध्वजवंदन कार्यक्रमानंतर मोबाईलद्वारे https://se.census.gov.in
या संकेतस्थळावर जाऊन स्व-गणना पूर्ण केली. त्यांनी नागरिकांना देखील याच पद्धतीने मोबाईलच्या माध्यमातून स्व-गणना करण्याचे आवाहन केले आहे.
स्व-गणना ही प्रक्रिया सोपी, जलद आणि पारदर्शक असून, यामुळे नागरिकांना घरबसल्या जनगणनेत सहभाग नोंदविता येणार आहे. अचूक व अद्ययावत माहितीच्या आधारे शासनाला नियोजन करणे अधिक सुलभ होणार असून, विविध विकास योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करता येणार आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात सहभागी होऊन आपले योगदान नोंदवावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. डिजिटल माध्यमाचा वापर करून जनगणना अधिक सुलभ करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
“आपली माहिती – देशाच्या विकासासाठी महत्त्वाची!” या भावनेतून प्रत्येकाने स्व-गणना पूर्ण करून जबाबदार नागरिकत्वाचे उदाहरण घालून द्यावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.
#Census2027#SelfEnumeration#DigitalIndia#Nandurbar#DistrictAdministration#MaharashtraDay#GoodGovernance#CitizenParticipation#eGovernance#India
















