सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते सोमवार, दि. २ मार्च, २०२६ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असतील. वांद्रे (पश्चिम) येथील आर. डी. नॅशनल कॉलेज येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे कौशल्य विकास सहायक आयुक्त शैलेश भगत यांनी दिली आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचे कौशल्य सर्वेक्षण करण्यात येत आहे. या माध्यमातून १८ ते ४० वयोगटातील युवकांचा कौशल्य कल जाणून घेऊन त्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर संबंधित उमेदवारांना जवळच्या आस्थापना व उद्योजकांकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील.
















