Home शेती आत्मा अंतर्गत प्रिंपाणी येथे ‘जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण’ कार्यक्रम यशस्वी

आत्मा अंतर्गत प्रिंपाणी येथे ‘जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण’ कार्यक्रम यशस्वी

0
आत्मा अंतर्गत प्रिंपाणी येथे ‘जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण’ कार्यक्रम यशस्वी
'Inter-district farmer training' program at Pimpani under Atma is a success

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व आत्मा (ATMA) अंतर्गत ‘जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण’ कार्यक्रमाचे आयोजन प्रिंपाणी येथे करण्यात आले. हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रकल्प संचालक आत्मा श्री. दीपक पटेल तसेच तालुका कृषी अधिकारी, शहादा श्री. के. एस. वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसरपंच श्रीमती ममता चौधरी उपस्थित होत्या. यावेळी उपसरपंच श्री. भाईदास बागले, मंडळ कृषी अधिकारी श्री. संदीप पाटोळे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख विषय विशेषज्ञ श्री. उमेश पाटील, कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. भरत चौधरी, उप कृषी अधिकारी श्री. भरत करंजे तसेच ग्रामसेविका श्रीमती संगीता नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मंडळ कृषी अधिकारी श्री. संदीप पाटोळे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट करत कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ श्री. उमेश पाटील यांनी वाटाणा व गहू पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच नैसर्गिक शेती याबाबत सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले. तर कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. भरत चौधरी यांनी वाटाणा व गहू पिकांवरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन विषयावर सखोल माहिती दिली.

यावेळी उप कृषी अधिकारी श्री. भरत करंजे यांनी कृषी विभागाच्या ए.आय. अ‍ॅपची माहिती देत शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष अ‍ॅप डाऊनलोड करून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. रवींद्र बच्छाव यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती मनीषा रावताळे यांनी केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमास परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सातपुडा डोंगरी शेती गटाचे अध्यक्ष श्री. रवींद्र चौधरी, श्री. युवराज चौधरी, श्री. शिवाजी ग्रेंद्रे व श्री. राजेंद्र चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here