
नियंत्रक शिधावाटप कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. धाडीदरम्यान स्टोअरच्या तळघरात विविध तेल कंपन्यांचे सिलेंडर मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेले आढळले. यामध्ये एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी आणि गो गॅस कंपनीचे एकूण 140 सिलेंडर जप्त करण्यात आले. त्यापैकी 55 सिलेंडर भरलेले तर 85 सिलेंडर रिकामे असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
जप्त करण्यात आलेल्या सिलेंडरची एकूण किंमत 4 लाख 59 हजार 400 रुपये इतकी असून हा संपूर्ण मुद्देमाल सीलबंद करण्यात आला आहे. ही कारवाई अवैध साठा व नियमबाह्य वापराच्या संशयावरून करण्यात आली. या प्रकरणात एक आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला चितळसर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. संबंधिताविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.















