आरोग्य सुविधा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. संसर्गजन्य आजारांवर मात करण्यासाठी व्यापक नियोजनाची आवश्यकता आहे. पाच किलोमीटरच्या परिघात सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे अद्ययावतीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) द्वितीय दीक्षान्त समारंभात सांगितले.
जगाला आज वैद्यकीय सेवेची गरज आहे. या संस्थेतून उत्तीर्ण होऊन भविष्याकडे वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपचाराबरोबरच करुणेचा भावही जपणे आवश्यक आहे. ज्ञान आणि करुणेचा संगम झाल्यास जीवनात यशस्वी व्हाल, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
















