अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील इयत्ता 1 ली ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्काची प्रतिपुर्ती केली जाते. प्रमाणित दराने शुल्क आकारणाऱ्या शासन मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित संस्थांमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क व सत्र शुल्क अदा केले जाते. खाजगी विना अनुदानित व कायम विना अनुदानित शाळांमध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील अनुसूचित जाती, विजाभज व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती 10 महिन्याच्या कालावधीकरिता केली जाते.
















