Home तळोदा तळोदा प्रकल्पातील आश्रमशाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत आढावा बैठक

तळोदा प्रकल्पातील आश्रमशाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत आढावा बैठक

2
Review meeting regarding the academic quality of Ashram schools under the Taloda project.

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली तळोदा प्रकल्पांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांची शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठक घेण्यात आली.

📚Foundational Literacy and Numeracy (FLN)अंतर्गत वर्षभरातील कामाचे नियोजन तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

📊 शाळानिहाय व मुख्याध्यापकनिहाय NIPUN विद्यार्थ्यांची सद्यस्थिती जाणून घेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पातळीनुसार आवश्यक हस्तक्षेपांवर भर देण्यात आला.

👩‍🏫 Teacher Capacity Building व Student Capacity Building, प्रभावी अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

🧪 Vocational Lab, Maker’s Lab आणि Mental Health Training यांचा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रभावी वापर करण्याबाबत चर्चा झाली.

🤝 उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर, शाळांची भूमिका आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग यावरही विशेष भर देण्यात आला.

📝 जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग व विविध NGO यांच्या समन्वयातून शिक्षण क्षेत्रासाठी कृती आराखडा (Action Plan) तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिले.

🌱 विविध संस्थांच्या कौशल्य व संसाधनांचा समन्वय साधून नंदुरबार जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये गुणवत्तापूर्ण, सर्वांगीण व भविष्याभिमुख शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.