जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली तळोदा प्रकल्पांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांची शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठक घेण्यात आली.
Foundational Literacy and Numeracy (FLN)अंतर्गत वर्षभरातील कामाचे नियोजन तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
शाळानिहाय व मुख्याध्यापकनिहाय NIPUN विद्यार्थ्यांची सद्यस्थिती जाणून घेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पातळीनुसार आवश्यक हस्तक्षेपांवर भर देण्यात आला.
Teacher Capacity Building व Student Capacity Building, प्रभावी अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
Vocational Lab, Maker’s Lab आणि Mental Health Training यांचा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रभावी वापर करण्याबाबत चर्चा झाली.
उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर, शाळांची भूमिका आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग यावरही विशेष भर देण्यात आला.
जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग व विविध NGO यांच्या समन्वयातून शिक्षण क्षेत्रासाठी कृती आराखडा (Action Plan) तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिले.
विविध संस्थांच्या कौशल्य व संसाधनांचा समन्वय साधून नंदुरबार जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये गुणवत्तापूर्ण, सर्वांगीण व भविष्याभिमुख शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
















