तळोदा तालुक्यातील विकासकामांना गती देण्याचे मा.पालकमंत्र्यांचे निर्देश

तळोदा येथील याहा मोगी सभागृहात विविध विकासकामे व शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी, मा.आमदार राजेश पाडवी, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
पूर्णत्वास येणारी कामे प्राधान्याने पूर्ण करावीत
आयुष्मान भारत कार्ड वितरणाला गती द्यावी
प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ पात्रांना मिळवून द्यावा
शैक्षणिक क्षेत्रातील रिक्त पदे भरावीत व शाळांमध्ये सुविधा वाढवाव्यात
तळोदा शहरातील मुख्य रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी
पीक कापणी प्रयोग व शेतकरी कर्जमुक्ती योजनेची कार्यवाही गतीने करावी
बंद विद्युत ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलून सुरळीत वीजपुरवठा करावा
दूध उत्पादन वाढीसाठी उपाययोजना कराव्यात
मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती करावी
स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण पाणीपुरवठा, जल जीवन मिशन, हर घर जल, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, वीज वितरण व वन विभागाच्या विविध योजनांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. 🤝
विकासकामे वेळेत पूर्ण करून योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

