तळोद्यात दुकानातून तीन महागडे मोबाइल लंपास

तळोदा : शहरातील कॉलेज चौफुलीजवळील एका दुकानातून तीन महागडे मोबाइल चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तळोदा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोद्यात दुकानातून तीन महागडे मोबाइल लंपास
talodyat-dukanatun-tin-mahagde-mobile-lampas

तळोदा येथील कॉलेज चौफुलीजवळ पप्पांच्या दुकानात रजनीशकुमार रामभरोसे यादव हे झोपलेले होते. त्यावेळी शहररुख बागवान यांच्या पप्पांच्या दुकानात मोबाइल फोन चार्जिंगला लावून ठेवण्यात आले होते.

दरम्यान, संधी साधून अज्ञात चोरट्याने सुमारे ८ हजार रुपये किमतीचा पोको सी-७१ कंपनीचा मोबाइल, २० हजार रुपये किमतीचा रेडमी नोट मोबाइल आणि १० हजार रुपयांचा सॅमसंग गॅलेक्सी मोबाइल, असे एकूण तीन मोबाइल चोरून नेले.

मोबाइल चोरीची घटना लक्षात आल्यानंतर रजनीशकुमार रामभरोसे यादव यांनी तळोदा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भा.दं.वि.च्या कलम ३०५ (अ) व ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अरुण सैदाणे करीत आहेत.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250