तळोद्यात धाडसी चोरी: पोलीस लाईनसमोरचे किराणा दुकान फोडून २० हजारांची रोकड लांबवली!

तळोदा:शहरात चोरांचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले असून, चक्क पोलीस लाईनच्या समोरील दुकान फोडण्यापर्यंत चोरांची मजल गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तळोदा येथील एका किराणा दुकानाचे शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २० हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. या घटनेमुळे स्थानिक व्यापारी वर्गात एकच खळबळळ उडाली असून सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
तळोद्यात धाडसी चोरी: पोलीस लाईनसमोरचे किराणा दुकान फोडून २० हजारांची रोकड लांबवली!
talodyat-dhadsi-chori-police-line-samorchya-kirana-dukanat-20-hajaranchi-rokad-lambavli
मिळालेल्या माहितीनुसार, तळोदा येथील रहिवासी अमोल भिमराव मराठे यांचे पोलीस लाईनच्या अगदी समोर ‘महाकाल किराणा दुकान’ नावाचे व्यावसायिक दुकान आहे. नेहमीप्रमाणे दिवसभराचा व्यवसाय आटोपून मराठे यांनी दुकान बंद केले होते. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत दुकानाच्या शटरचे कुलूप कशाच्या तरी साहाय्याने तोडले आणि आत प्रवेश केला. दुकानात ठेवलेली २० हजार रुपयांची रोकड चोरून चोरटे पसार झाले.
सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले असता, कुलूप तुटलेले आणि शटर उचकटलेले पाहून मराठे यांना मोठा धक्का बसला. आत जाऊन पाहणी केली असता गल्ल्यातील रोकड लंपास झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या धाडसी चोरीप्रकरणी अमोल भिमराव मराठे यांनी तातडीने तळोदा पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद नोंदवली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०५ (अ) आणि ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेकॉ. छोटू शिरसाठ यांच्याकडे सोपवण्यात आला असून, पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर सुगावांच्या आधारे चोरट्यांचा माग काढत आहेत.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250