शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा!

Tata AIG CSR, Swasti Bengaluru आणि नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्था यांच्या सहकार्याने हा उपक्रम नंदुरबारसह महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आयुष्मान भारत (PM-JAY) कार्ड मोफत उपलब्ध करून देण्यात येत असून, २०२४-२५ मध्ये सुमारे ३४ हजार आणि २०२५-२६ मध्ये ३५ हजार पात्र लाभार्थ्यांना कार्ड मिळाले. यावर्षी ४० हजार लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे.
अक्कलकुवा व धडगावच्या दुर्गम, आदिवासीबहुल भागावर विशेष लक्ष देत सिकलसेल सेवा, संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान भारत वयोवंदना योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळवून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
गावपातळीवर जनजागृती, पात्र लाभार्थी शोध, मार्गदर्शन आणि शासकीय यंत्रणांशी समन्वय अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. या माध्यमातून योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

