जिल्हास्तरीय लोकशाही दिनी प्राप्त अर्जांवर सुनावणी
(नंदुरबार) जनतेच्या तक्रारी व समस्या प्रशासनापर्यंत थेट पोहोचवून त्यांचे निराकरण करण्यासाठी आयोजित जिल्हास्तरीय लोकशाही दिनात नागरिकांकडून एकूण २ अर्ज प्राप्त झाले. यामध्ये महसूल विभागाचे १ आणि जिल्हा परिषदेचा १ अर्जाचा समावेश आहे.

यापूर्वी दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी प्राप्त झालेल्या ५ अर्जांपैकी संबंधित प्रकरणांवर कार्यवाही करण्यात आली. तसेच दि. ७ सप्टेंबर रोजी प्राप्त अर्जांवर प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करून नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यावर भर देण्यात आला.
लोकशाही दिनाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी थेट व्यासपीठ उपलब्ध होत असून, प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक प्रभावी करण्यास यामुळे मदत होत आहे.
Follow Us:

