सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर; पुणे विद्यापीठात २८ ज्ञानशिल्पांचे लोकार्पण

सावित्रीबाईफुले यांच्या जीवनकार्याची आणि परिवर्तनवादी विचारांची साक्ष देणाऱ्या २८ ज्ञानशिल्पांचे लोकार्पण करण्याचे भाग्य लाभणे हा माझ्यासाठी मनस्वी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. या ज्ञानशिल्पांतून शिक्षण, मानवता, समता, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ज्ञानशिल्प लोकार्पण समारंभास विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश […]
सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर; पुणे विद्यापीठात २८ ज्ञानशिल्पांचे लोकार्पण
Celebrating the ideals of Savitribai Phule; 28 'Gnyanshilpas' (Sculptures of Knowledge) unveiled at Pune University.

सावित्रीबाईफुले यांच्या जीवनकार्याची आणि परिवर्तनवादी विचारांची साक्ष देणाऱ्या २८ ज्ञानशिल्पांचे लोकार्पण करण्याचे भाग्य लाभणे हा माझ्यासाठी मनस्वी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. या ज्ञानशिल्पांतून शिक्षण, मानवता, समता, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ज्ञानशिल्प लोकार्पण समारंभास विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, कुलसचिव प्रा. डॉ. कपिल पवार, विद्यापीठाच्या आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पांडे, विविध व्यवस्थापन मंडळांचे सदस्य, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: