जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 9 वी व 11 वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

(नंदुरबार) जवाहर नवोदय विद्यालय, श्रावणी (ता. नवापूर, जि. नंदुरबार-२) येथे लॅटरल एंट्री निवड चाचणी प्रवेश परीक्षा 2027 (LEST) अंतर्गत इयत्ता नववी आणि अकरावीच्या रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती प्राचार्य पी. आर. कोसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 9 वी व 11 वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुरू
JNV-CLASS-9-11-ADMISSION

पात्रतेच्या अटी व नियम:
• शाळा व वर्ग: नंदुरबार जिल्ह्यातील (फक्त नवापूर व नंदुरबार तालुका) शासनमान्य शाळेत शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये विद्यार्थी इयत्ता 9 वीच्या प्रवेशासाठी सध्या इयत्ता 8 वीत, तर इयत्ता 11 वीच्या प्रवेशासाठी सध्या इयत्ता 10 वीत शिकत असणे आवश्यक आहे. तसेच सन 2026-27 मध्ये संबंधित इयत्ता उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
वयोमर्यादा:
• इयत्ता 9 वी: विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 2012 ते 31 जुलै 2014 या दरम्यान झालेला असावा.
• इयत्ता 11 वी: विद्यार्थ्याचा जन्म 1 जून 2010 ते 31 जुलै 2012 या दरम्यान झालेला असावा (दोन्ही दिवस समाविष्ट). ही अट सर्व संवर्गांतील विद्यार्थ्यांसाठी लागू राहील.
• आरक्षण: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग, दिव्यांग आणि सर्व प्रवर्गातील मुलींसाठी नियमानुसार जागा राखीव आहेत. तसेच तृतीयपंथी उमेदवारही अर्ज करण्यास पात्र आहेत.
आवश्यक कागदपत्रे:
विद्यार्थ्यांचे ओळखपत्र (उदा. आधार कार्ड) / जन्म दाखला, जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास), विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो, विद्यार्थ्याची स्वाक्षरी आणि पालकांची स्वाक्षरी आवश्यक आहे.
अर्ज भरण्याची पद्धत व महत्त्वाची माहिती:
• अर्ज प्रक्रिया: अर्ज पूर्णपणे ऑनलाईन व मोफत असून मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपद्वारे भरता येईल.
• अधिकृत संकेतस्थळ: विद्यार्थी नवोदय विद्यालय समितीच्या https://navodaya.gov.in](https://navodaya.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून अथवा इयत्ता 9 वी व 11 वीसाठी उपलब्ध असलेल्या पोर्टलवरून अर्ज करू शकतात.
• अर्ज करण्याची अंतिम मुदत: 30 सप्टेंबर 2026.
• परीक्षेचा दिनांक व वेळ: शनिवार, 10 एप्रिल 2027 सकाळी 11:30 वाजता.
पात्र विद्यार्थ्यांनी मुदतीच्या आत ऑनलाईन अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य श्री. कोसे यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250