विज्ञापित

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत; कनकेश्वर सेवा मंडळ व सहयोग सोशल ग्रुपचा उपक्रम

तळोदा : शिक्षणाच्या वाटचालीत आर्थिक अडचणी अडथळा ठरू नयेत, या उद्देशाने तळोदा येथील कनकेश्वर सेवा मंडळ व सहयोग सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले.
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत; कनकेश्वर सेवा मंडळ व सहयोग सोशल ग्रुपचा उपक्रम
garju-vidyarthyanna-shaikshanik-sahityachi-madat-kanakeshwar-seva-mandal-va-sahyog-social-groupcha-upakram

तळोदा शहरातील शेठ के. डी. हायस्कूल तसेच जिल्हा परिषद शाळा, भोईगल्ली येथील विद्यार्थ्यांना नोटबुक, कंपास, पेन यासह आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

विज्ञापित

यावेळी कनकेश्वर सेवा मंडळाचे सदस्य सुरेश चौधरी, प्रा. डॉ. आर. डी. मंडल, सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष अॅड. अल्पेश जैन, शेठ के. डी. हायस्कूलचे उपमुख्याध्यापक जे. एन. माळी, मयूर सागर, विजय चौधरी तसेच जिल्हा परिषद शाळेचे खैरनार आदी उपस्थित होते.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कनकेश्वर सेवा मंडळाचे युवा कार्यकर्ते सागर कलाल, फागण शेठे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याने पालक व शिक्षकांकडूनही या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: