Home नंदुरबार जिल्हा रेल्वे गेट क्र. 86 वरील अंडरब्रिज दुरुस्तीसाठी वाहतुकीत बदल;15 जूनपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावा

रेल्वे गेट क्र. 86 वरील अंडरब्रिज दुरुस्तीसाठी वाहतुकीत बदल;15 जूनपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावा

0
रेल्वे गेट क्र. 86 वरील अंडरब्रिज दुरुस्तीसाठी वाहतुकीत बदल;15 जूनपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावा
Traffic changes due to underbridge repairs at Railway Gate No. 86; use alternative routes until June 15.

(नंदुरबार) उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनुसार नंदुरबार शहरातील रेल्वे लेव्हल क्रॉसिंग गेट क्र. 86 या मार्गावरील आरयूबी (Road Under Bridge) खराब असून त्यामध्ये पाणी साचून राहत असल्याने त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जारी केले आहेत.

रेल्वे प्रशासनामार्फत सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामासाठी यापूर्वी संबंधित मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, निर्धारित कालावधीत काम पूर्ण न झाल्याने दुरुस्तीचे काम पुढे सुरू ठेवण्यासाठी वाहतूक बंद ठेवण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.

मुंबई पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 33(s) तसेच मोटार वाहन अधिनियम, 1988 चे कलम 115 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हादंडाधिकाऱ्यांनी हा आदेश निर्गमित केला आहे. त्यानुसार 05 जून 2026 रोजी रात्री 08.00 वाजल्यापासून ते 15 जून 2026 रोजी रात्री 08.00 वाजेपर्यंत रेल्वे लेव्हल क्रॉसिंग गेट क्र. 86 वरील आरयूबी मार्गावरील मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

या कालावधीत संबंधित मार्गावरील वाहतूक रेल्वे क्रॉसिंग गेट क्र. 88 या पर्यायी रस्त्याने वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी व नागरिकांनी वाहतुकीसंदर्भातील सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रेल्वे प्रशासन, उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस प्रशासन यांच्या मदतीने आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक, रेडियम रिफ्लेक्टर, बॅरिकेडिंग तसेच इतर सुरक्षा उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच रेल्वे प्रशासनाने आरयूबीच्या दुरुस्तीचे काम विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here