कृषी विभाग नंदुरबार, Paani Foundation आणि UMED Maharashtra यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप 2026 अंतर्गत नवापूर तालुक्यातील दोन बॅचचे निवासी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले. हे प्रशिक्षण पर्यावरण अभ्यास केंद्र, बारीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथे संपन्न झाले.
दुसरी व अंतिम बॅच दिनांक 16, 17 व 18 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडली. दि. 16 फेब्रुवारी रोजी नवापूर तहसील कार्यालय मैदान येथे सर्व शेतकरी बंधू-भगिनींच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री. पंकज कव्हाड व सहाय्यक कृषी अधिकारी श्री. संतोष कोकणी तसेच उमेद अभियानाचे प्रभाग समन्वयक श्री. प्रविण राठोड उपस्थित होते.
या तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणात तालुक्यातील 47 गावांतील एकूण 63 शेतकरी बंधू-भगिनींनी सक्रिय सहभाग घेतला. जलसंधारण, सामूहिक श्रम, शाश्वत शेती पद्धती आणि गावस्तरावरील नियोजन या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण उत्साही व प्रेरणादायी वातावरणात पार पडले.
दरम्यान, दोन्ही बॅच मिळून नवापूर तालुक्यातील एकूण 77 गावांतील 115 शेतकरी बंधू-भगिनींनी फार्मर कप 2026 चे प्रशिक्षण पूर्ण केले. सामूहिक सहभाग, नियोजनबद्ध अंमलबजावणी आणि शाश्वत विकासाच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.
या उपक्रमासाठी कृषी विभाग व उमेद अभियानाचे मोलाचे सहकार्य लाभले असून, नवापूर तालुका जलसंधारण आणि शाश्वत शेतीच्या दिशेने सक्षम पावले टाकत असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.
Paani Foundation @paanifoundation
#farmercup2026#WaterConservation#SustainableAgriculture#UMED#PaaniFoundation
















