Home महाराष्ट्र ‘विकसित महाराष्ट्र’ अंतर्गत एसटी महामंडळामध्ये सन २०२९ पर्यंत ५० टक्के, २०३५ पर्यंत...

‘विकसित महाराष्ट्र’ अंतर्गत एसटी महामंडळामध्ये सन २०२९ पर्यंत ५० टक्के, २०३५ पर्यंत ८० टक्के; तर २०४७ पर्यंत एसटी चा १०० टक्के ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरीत करायचा आहे.

0
Under 'Developed Maharashtra', 50 percent of the ST Corporation's fleet is to be converted to e-buses by 2029, 80 percent by 2035, and 100 percent by 2047.

अनुषंगाने बसेससाठी आवश्यक असलेले चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बैठकीत दिले.

पर्यावरणपूरक ई-बसेस ज्या मार्गावर चालवायच्या आहेत, त्या मार्गाचा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने अभ्यास करावा. पुरवठादाराकडून बस प्राप्त होताच त्या बसेसचे पुढील ७ दिवसात निरीक्षण करावे. या बसेसकरिता एक इकोसिस्टिम तयार करावी. ज्या मार्गाने खाजगी बसेस धावतात, त्या मार्गाचाही अभ्यास करून ई-बसेसचा पर्याय तयार ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. या प्रकल्पामुळे राज्यातील प्रवाशांना आधुनिक, आरामदायी आणि प्रदूषणमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचेही त्‍यांनी सांगितले.

बैठकीस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (दूरदृश्य प्रणालीद्वारे) मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, अपर मुख्य सचिव संजय सेठी, एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, उपसचिव चेतन निकम आदी उपस्थित होते.

#MSRTC

#विकसितमहाराष्ट्र