ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचे निर्देश ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी या संदर्भातील बैठकीत दिले.
समितीमार्फत प्रस्तावाची तांत्रिक, प्रशासकीय व आर्थिक बाबींची सविस्तर तपासणी करून अहवाल सादर करावा. समितीच्या छाननीनंतर नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश मंत्री श्री. गोरे यांनी दिले.
बैठकीस आमदार समीर मेघे, सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह संबंधित अधिकारी प्रत्यक्ष तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
















