Home महाराष्ट्र अष्टविनायक आराखड्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाने मंदिरांच्या जतन व संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून दिला...

अष्टविनायक आराखड्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाने मंदिरांच्या जतन व संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून दिला असून, पुरातत्व विभागामार्फत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत.

0
Under the Ashtavinayak Plan, the Maharashtra Government has provided funds for the preservation and conservation of temples, and various works have been undertaken through the Archaeological Department.

रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिर, येथे सुरू असलेल्या जतन व दुरुस्ती कामांमुळे सदर मंदिर १५ एप्रिल २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

मागील तीन महिन्यांपासून मंदिरातील मुख्य रचना तसेच परिसरातील जतन, दुरुस्ती व संवर्धनाची कामे प्रगतीपथावर आहेत. या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा ठराव घेतला असून, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग यांनीही त्यास मान्यता देत संबंधित आदेश जारी केले आहेत.

या कालावधीत मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी श्री महागणपती यांची नित्य पूजाअर्चा, अभिषेक व इतर धार्मिक विधी नियमानुसार सुरू राहणार आहेत. मात्र, भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश किंवा प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. तसेच बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी-कर्मचारी व विश्वस्त यांच्याशिवाय इतर कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.