Home सरकारी योजना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांच्या परिस्थितीचा...

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांच्या परिस्थितीचा आढावा घेतला

1
Women and Child Development Minister Aditi Tatkare reviewed the situation in water-scarce villages of Shrivardhan Taluka.

तालुक्यातील प्रत्येक गावासाठी स्वतंत्र सूक्ष्म नियोजन करावे. तसेच संबंधित गावातील पाण्याचा स्रोत, नाले, बंधारे, साठवण तलाव आणि इतर जलस्रोतांचा अभ्यास करून भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार नाही, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

कृषी, वन आणि जलसंवर्धन विभागाच्या समन्वयातून ही कामे हाती घेण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावेत. श्रीवर्धन तालुक्यात सध्या २८ गावे आणि ३६ वाड्या पाणीटंचाईच्या समस्येने प्रभावित असून, प्रत्येक गावासाठी स्वतंत्र सूक्ष्म नियोजन करून दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात – मंत्री आदिती तटकरे