Home नोकरी-करिअर कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय रोजगार...

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय रोजगार मेळावा समितीची बैठक झाली

1
A meeting of the state-level employment fair committee was held under the chairmanship of Mangal Prabhat Lodha, Minister for Skill Development, Employment, Entrepreneurship, and Innovation.

राज्यात युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ दरम्यान एक हजार रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. या रोजगार मेळाव्यांची माहिती व्यापक प्रमाणात गरजू तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणे गरजेचे असल्याचे मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले.

या उपक्रमाच्या नियोजन आणि अंमलबजावणीसाठी संबंधित विभागाचे अधिकारी व प्रदेश समन्वय समिती यांनी एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समन्वय समिती व विभागीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन मेळावे यशस्वी करूया – मंत्री लोढा

यावेळी राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचे अध्यक्ष डॉ. रणजीत पाटील, कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचे आयुक्त डॉ.अमित सैनी आदी उपस्थित होते.

#रोजगारमेळावा

#कौशल्यविकास