महाराष्ट्राचा पर्यटन ब्रँड राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी डिजिटल प्रसिद्धी
प्रभावी जनसंपर्क आणि नाविन्यपूर्ण माध्यमांचा व्यापक वापर करणे आवश्यक आहे. राज्याची समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक वैभव आधुनिक माध्यमांतून जगासमोर प्रभावीपणे मांडले गेले पाहिजे, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले. विज्ञापित पर्यटन संचालनालयामार्फत २०२६-२७ या वर्षातील जनसंपर्क विभाग आणि सामाजिक माध्यमांअंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा सविस्तर आढावा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या […]
प्रभावी जनसंपर्क आणि नाविन्यपूर्ण माध्यमांचा व्यापक वापर करणे आवश्यक आहे. राज्याची समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक वैभव आधुनिक माध्यमांतून जगासमोर प्रभावीपणे मांडले गेले पाहिजे, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
विज्ञापित
पर्यटन संचालनालयामार्फत २०२६-२७ या वर्षातील जनसंपर्क विभाग आणि सामाजिक माध्यमांअंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा सविस्तर आढावा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे घेण्यात आला. या बैठकीस पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे, पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे, सहसंचालक संतोष जाधव, सहायक संचालक रवींद्र पवार, कार्यकारी अभियंता आकाश चकोर तसेच संबंधित मीडिया एजन्सींचे प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.
विज्ञापित
Follow Us:

